ग्रामपंचायत हमरापूर आपले सहर्ष स्वागत करित आहे....
fff
ग्रामपंचायत हमरापूर

हमरापूर, ता.वाडा, जि.पालघर

f

vpzppalgharwadahamrapur@gmail.com

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

सौ.अवनी अजय सांबरे

सरपंच

avanisambare7@gmail.com

श्री.अजय गोपीनाथ चौधरी

उपसरपंच

ajaychaudhari871@gmail.com

सौ.रीना अमित पिंपळे

ग्रामपंचायत अधिकारी

reenapimple266@gmail.com


हमरापूर गाव...
हमरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.गावाच्या उत्तरेला विक्रमगड तालुका, पूर्वेला शहापूर तालुका, पश्चिमेला पालघर तालुका आहे.
वाडा बस स्थानकापासूनराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

1963

लोकसंख्या

495

कुटूंब संख्या

2

महसूल गाव

3

वार्ड

6.30

क्षेत्रफळ (चौ.की.मी.)

5

अंगणवाडी

3

जि.प.शाळा

1

हायस्कूल

192647

एल जी डी कोड

1

पर्यटन स्थळ

फोटो गॅलरी

माननिय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते, आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम योजना सन २०२३-२०२४ पुरस्कार देण्यात आला

माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते घरकुल पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

जिल्हा परिषद शाळा हमरापुर येथील मुलांनी स्वच्छता रॅली काढण्यात आली

अधिक फोटो पहा.....



ग्रामपंचायत हमरापुरला माननिय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते, आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम योजना सन २३-२४ पुरस्कार देण्यात आला
आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम योजना सन २३-२४ पुरस्कार देण्यात आला
ग्रामपंचायत हमरापूर येथे माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे सर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संत गाडगेबाबा पुरस्कार
हे एक नाविन्यपूर्ण मॉडेल आहे, जे ग्रामीण भागातील पर्यावरणाचे संवर्धन करते आणि शाश्वत विकासाला चालना देते.येथे वृंदावनच्या जंगलाप्रमाणे शांत आणि सुंदर परिसर आहे, जिथे पाहुणे दिवसा भेट देऊ शकतात.दिवसभरासाठी अभ्यागतांना मोफत प्रवेश मिळतो आणि तुम्ही सकाळ १० ते संध्याकाळ ६ वाजेपर्यंत फिरू शकता.
गोवर्धन इकोव्हिलेज
© हे ग्राम पंचायत हमरापूर यांचे अधिकृत संकेत स्थळ आहे.सर्व हक्क सुरक्षित.
Last Updated on : 04/10/2025
Top